Breaking: शिवरायांविषयी अपशब्द काढणारा छिंदम विजयी

Foto

अहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम महानगरपालिकेच्या निवडणूकीत विजयी झाला आहे. वार्ड क्र, ९ मधून २००० मतांच्या फरकाने छिंदम विजयी झाला आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणूकीतील या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

माजी उपमहापौर छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्याच्या विरोधात संतापाची लाट पसरली होती. भाजपने त्याला पक्षातून निलंबित देखील केले होते. या निवडणूकीत  छिंदम अपक्ष उमेदवार होता. मात्र त्याने भाजपच्याच उमेदवाराला पराभूत करत विजय मिळवला आहे.

याधी श्रीपादचा भाऊ श्रीकांत याने ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.